
माजीराज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पुढाकाराने संगमेश्वर-साखरपा रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको
संगमेश्वर- देवरुख- साखरपा हा राज्य महामार्ग वाहतुकीस अयोग्य असल्याच्या निषेधार्थ साडवली येथे बुधवारी महाविकास आघाडीच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पुढाकाराने संगमेश्वर- साखरपा मार्गावरील साडवली ग्रामपंचायत कार्यालयानजीक सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दुरुस्त करा, दुरुस्त करा संगमेश्वर-देवरुख- साखरपा रस्ता दुरुस्त करा, जनतेच्या एकजुटीचा विजय असो, ३२ कोटी गेले कुठे संगमेश्वर – साखरपा रस्ता शोधू कुठे, महाविकास आघाडीचा विजय असो, रस्त्याचे पैसे पाण्यात जनता कोमात अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, युयुत्सु आर्ते, अशोक जाधव, सुरेश बने, बंड्या बोरूकर, रवींद्र डोळस, रास्ता रोकी आंदोलन राजेंद्र जाधव, प्रद्युम्न माने, श्रीकृष्ण जागुष्टे, अनुराग कोचिरकर, सागर संसारे, नेहा माने, वेदा फडके, नीलम हेगशेट्ये, ऐश्वर्या घोसाळकर, दीपिका किर्वे, मेघा कदम यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.www.konkantoday.com




