सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत ४८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

0
219

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत ४८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 710 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 420 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 48 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 372 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 290 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 135 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 81 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 30 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये  24 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 647 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 48 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 39 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here