शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा अजून कोणताही विचार नाही

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वात आधी शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा अजून कोणताही विचार दिसत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लहान मुलांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकतं. कारण कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये अधिक दिसून आला आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शाळा उघडतात. पण यावर्षी तसं होईल असं वाटत नाही. स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.
‘मुलांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असल्यानं पहिली प्राथमिकता त्याला असेल.शिक्षक, अधिकारी यांच्याशी यासंदर्बात बोलणं झालं आहे. पालकांशीही मी बोलणार आहे, त्यांना विश्वास आल्याशिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार नाही. कोरोनामुळं प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, त्यानुसार निर्णय घेतले जातील.’ असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

Buy products from Amazon

want Tv at cheap cost ?

Here you go ……….

Kevin 60 cm (24 Inches) HD Ready LED TV KN24832 (Black) | With Inbuilt Soundbar

Price – only 5499/- click on link below video to buy

https://amzn.to/3gtccpq


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button