
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा अपिल
देशासह विदेशात कोरोनाचा कहर सुरु असताना या आजारापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून विविध मार्गांचा तसेच सूचना देण्याचा वापर केला जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा एक अपिल केलं आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगण्यात आल्या आहेत. १. लोकांनी सातत्याने आपले हात धुतले पाहिजेत व २. इतरांपासून सुरक्षित अंतर राखलं पाहिजे, असं हे अपिल आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनच नव्हे तर संपूर्ण जगभरात याच सूचना दिल्या जात आहेत आणि वारंवार त्याची लोकांना आठवण करुन दिली जात आहे.
www.konkantoday.com