
वनविभागाने सुरू केलेल्या जीपच्या सफरीमधून ८१० पर्यटकांनी केली नरेंद्र वनउद्यान सफर
सावंतवाडी वनविभागामार्फत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सिंधुरत्न योजनेंतर्गत आयोजित नरेंद्र वनउद्यान जीप सफरीतून १६ ते ३० मार्चअखेर एकूण ८१० पर्यटकांनी सफर केली आहे. अशी माहिती सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.१६ मार्चपासून सुरू झालेल्या या जीप सफरीच्या एकूण ८१ फेर्या साावंतवाडी शहरातील भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर वनउद्यानपर्यंत नेण्यात आल्या. या सफरीमुळे नरेंद्र डोंगर वनउद्यानात रेणार्या पर्यटकांची संख्या वाढलेली पहायला मिळते. सावंतवाडी शहरापासून सुरू झालेल्या सफरीदरम्यान नरेंद्र डोंगर व त्यानंतर निसर्ग केंद्रात जावून जैवविविधतेची माहिती तेथे नेमण्यात आलेल्या गाईडतर्फे दिली जाते. तसेच सावंतवाडी दर्शन मनोर्यावरून संपूर्ण सावंतवाडीचे दृश्य पाहता येते. www.konkantoday.com