
मुस्लिम बांधवांनी रत्नागिरी जिल्ह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली
गेले महिनाभर रोजा अर्थात उपवास धरल्यानंतर रमजान महिना सोमवारी ईदने साजरा करण्यात आली. रमजान महिन्याला मुस्लिम धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्हाभरात नमाज पठण करून मुस्लिम बांधवानी ईद साजरी केली.
रमजान महिना मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच ईद सण साजरा होतो. सोमवारी ईद हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला हाेता. रत्नागिरी पोलिसांच्या वतीने देखील मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.
www.konkantoday.com