राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले
राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले आहेत. एकट्या मुंबईमध्येच कोरोनाग्रस्तांची संख्या १,५६६नी वाढली आहे. यामुळे राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७,१९० एवढा झाला आहे, तर १,५७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनाच्या ६० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
राज्यात काल ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com