
कशेडी बोगद्यात होतोय वाहनांवर पाण्याचा अभिषेक
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. बोगद्यातील अंतर्गत प्रलंबित कामांमुळे बोगद्यातील एकेरी वाहतुकीला कोणत्याही क्षणी ब्रेक लागण्याची वेळ येत आहे. त्यात आता वाहनांवर होणार्या जलाभिषेकाचीही नव्याने भर पडली आहे. बोगद्यातून मार्गस्थ होणार्या वाहनांवर भूगर्भातील जलाशयाचा होणारा मारा अद्याप कायम आहे. बोगद्याच्या वरील भागातून संततधार पाणी पडत असून कातळातून नेमके पाणी येते कुठून याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या कशेडी बोगद्याचा ठेका राष्ट्रीय हायवे ऑथोरिटी आॉफ इंडिया यांच्या आराखड्यानुसार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयामार्फत रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आला. ठेकाधारक कंपनीने या कामी एका पोट ठेकेदार कंपनीमार्फत बोगद्याचे काम हाती घेण्यात आले. काम करत असताना भौगोलिक व भूपृष्ठाखालील नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला गेला नसल्याचे बोलले जात आहे. www.konkantoday.com