रत्नागिरी जिल्ह्यात अजून ६ रुग्ण कोरोना मुक्त, जिल्हावासियांना दिलासादायक बातमी
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सहा covid-19 रुग्णांना आज उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.यातील ३ रुग्ण साखरतर येथील,२ रुग्ण नाखरे येथील आणि १ रुग्ण मेर्वी येथील आहे.
यामुळे आता घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४२ झाली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ८५ झाली आहे.
आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तीन महिला असून तीन पुरुष आहेत या व्यतिरिक्त एका महिलेने सोबत रुग्णालयात असणाऱ्या १६ महिन्यांच्या मुलाला ही आज घरी जाता आले.
www.konkantoday.com