मुंबईतून येणार्या चाकरमान्यांना माखजनजवळच्या धामापूर गावातील देवस्थळी कुटुंबियांनी दिला आधार
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून एरव्ही जिल्ह्यात चाकरमानी आले की खुष असणारे गावकरी यावेळी कोरोनाच्या भीतीमुळे चाकरमान्यांना सहजासहजी स्विकारण्यास तयार नाहीत. यामुळे अनेक गावात चाकरमान्यांना राहण्याच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील माखजन जवळच्या धामापूर गावातील देवस्थळी कुटुंबियांनी मोठे मन करत गावात आलेल्या चाकरमान्यांना आपले घर उपलब्ध करून देवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. धामापूर गावातील सुवर्णा आणि सुर्यकांत देवस्थळी यांचा मुलगा नोकरीनिमित्त मुंबईला आहे. तो कोरोना नियंत्रणात आल्याशिवाय गावी येणार नाही. त्यामुळे त्यांचे शेजारी असलेले घर रिकामे होते. हे घर त्यांनी चाकरमान्यांना उपलब्ध करून दिले. सध्या या ठिकाणी गावात आलेले चार ते पाच चाकरमानी रहात असून आणखी दोन तीन चाकरमान्यांची सोय या ठिकाणी होवू शकते. काही गावात चाकरमान्यांना विरोध होत असतानाच देवस्थळी कुटुंबियांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
www.konkantoday.com