
आरोपीवर तात्काळ कारवाई करा मागणीसाठी हिंदू समाजाचा भव्य मोर्चा
* रत्नागिरी शहरातील एमआयडीसीमध्ये वासराचे मुंडके रस्त्यावर आढळल्याने मोठ्या संख्येने हिंदु समाज एकवटला ४८ तासात आरोपीचा शोध घ्या अन्यथा आम्हाला मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज सकल हिंदु समाजाच्या वतीने धडक मोर्चा निघाला आहे. मोठ्या सख्येने लोक सहभागी झाले मोर्चा जिल्हा अधिक्षक कार्यालयापर्यंत गेला. घोषणा जोरदार सुरु आहेत आणि जिल्हा अधिक्षक कार्यालय रोडवर पोलिस यंत्रणा सज्ज आहे.रत्नागिरी शहर परिसरात काय चालते, याची आम्हाला पूर्ण कल्पना असून ४८ तासात तुम्ही आरोपीला अटक करणार होतात त्याचे काय झाले? असा खडा प्रश्न माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्याचे बाजूला राहीले, उलट तुम्ही सकल हिंदु समाजाच्या नेत्यांना नोटीस पाठवित आहात हे खपवून घेतले जाणार नाही. आम्हाला माहिती आहे की कोकणनगर परिसरात काय चालते, अजून आरोपीला का अटक करण्यात आली नाही. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक आणि सकल हिंदु समाजाच्या नेत्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेत एसआयटी स्थापन करुन सत्वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. स्वतंत्र पथक नेमून रत्नागिरीत सुरु असलेले हे प्रकार थांबवावे. असा इशारा आंदोलक प्रतिनिधींनी दिला. जिल्हा पोलिस अधिक्षक आणि प्रतिनिधी मंडळ यांच्यात चांगला सुसंवाद घडवून आणण्याचे काम काही पोलिस कर्मचार्यांनी केले. भरपावसात हा मोर्चा उभा आहे.