देवरूखमधील औषधांची दुकाने आता दररोज रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार

0
25

देवरूखमधील औषधांची दुकाने आता दररोज रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर शासनाने औषधांची सोडून अन्य दुकानांसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी वेळ दिली आहे. राज्य आणि केंद्र शासनाचा आदेश असतानाही देवरूख शहरातील औषधांची दुकाने काल (दि. २२ मे) संध्याकाळी ५ वाजता बंद करण्यास भाग पाडण्यात आले. आज देवरूखचे तहसीलदार सुहास थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी औषधांची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here