
उद्यापासून रत्नागिरी जिल्हा अंतर्गत एसटी बस वाहतूक सुर,मात्र अद्याप शहर बस वाहतुकीचा निर्णय नाही
रत्नागिरी जिल्हा अंतर्गत उद्यापासून एसटी बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामधून जिल्ह्यातील ३२ मार्गावर एसटीच्या ५२ फेऱ्या आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार आहेत.प्रत्येक आगारातून ही बस वाहतूक सुरू होणार आहे.खूप कडक नियमांसह ही बस धावेल. एसटीमध्ये प्रवेश करताना हातावर सॅनिटायझर लावावा लागेल. एसटीची प्रवासी क्षमता ५२ ते ५५ असते.मात्र आता ती निम्म्यावर येणार आहे. एकाच आसनावर एकालाच बसता येईल. त्यामुळे प्रत्येकाला खिडकीकडची जागाच मिळेल. केवळ जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू होणार आहे.एसटीत बसताना मास्कची सक्ती असेल. प्रवाशांच्या संख्येनुसार एसटीचे वेळापत्रक ठरणार आहे.मात्र अद्याप शहर बस वाहतुकीचा काहिच निर्णय झालेला नाही आहे.
www.konkantoday.com