
१ जून पासून रोज २०० विशेष ट्रेन्स धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
देशभरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतासाठी राजधानी स्पेशल सुरु केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस सुरु करणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे.
१ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जातील असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या ट्रेन्ससाठीचे ऑनलाइन बुकिंगही लवकरच सुरु होईल असंही गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.
www.konkantoday.com
