
लायन्स क्लब रत्नागिरीच्या कार्याची दखल, २० पारितोषिके पटकावली
लायन्स क्लब रत्नागिरीने गेल्या वर्षभरात एकूण ६६० सेवाकार्ये करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध शाळांमध्ये स्पर्धा घेवून शाळांच्या गरजा ओळखून जास्त काम केले आहे. याची दखल घेत कराड येथे झालेल्या सेवा सन्मान या कार्यक्रमात लायन्सस क्लब रत्नागिरीचा २० पारितोषिके देवून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात बेस्ट प्रेसिडेंट शिल्पा पानवलकर, बेस्ट सेक्रेटरी संजय पटवर्धन, बेस्ट ट्रेझरर श्रद्धा कुलकर्णी तर सर्वोत्कृष्ट झोन चेअरमन म्हणून श्रेया केळकर यांना मानाची ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. शिल्पा पानवलकर यांच्या २०२३-२४ या अध्यक्षपदाच्या कालावधीतील कार्यासाठी लायन्स क्लब रत्नागिरीला एकूण ४९ बक्षीसे मिळाली.www.konkantoday.com