
कर्नाटकातील दसरा महोत्सवासाठी देवरुखातील विलास रहाटेे यांनी १२×१७ फुट आकाराची भव्य दिव्य पोस्टर रांगोळी साकारली
कर्नाटक राज्यातील बेडकिहाळ गावात दरवर्षी दसरा महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या महोत्सवात विविध प्रकारचे उपक्रम आणि खास आकर्षण यांची मेजवानी असते.
देवरुखातील विलास रहाटे यांनी या महोत्सवात कर्तव्य फाऊंडेशन यांच्या सौजन्याने तब्बल १२×१७ फुट आकाराची भव्य दिव्य पोस्टर रांगोळी साकारली.
या आकाराची पोस्टर रांगोळी साकारण्यासाठी साठ तासाचा अवधी लागतो परंतु रांगोळीकार विलास यांनी ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाची १२×१७ फुट आकाराची पोस्टर रांगोळी फक्त वीस तासामधे साकारली आहे.
या दसरा महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या या पोस्टर रांगोळी पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. कर्नाटमधील या दसरा महोत्सवात कर्तव्य फाऊंडेशन यांच्या वतीने गेली पाच वर्ष विलास यांना खास रांगोळी साकारण्यासाठी निमंत्रित केले जाते.
यापूर्वी या महोत्सवात विलास यांनी तान्हाजी, पुष्पा, महाभारत, पोर्ट्रेट अशा भव्यदिव्य रांगोळी साकारल्या आहेत. या रांगोळीसाठी अक्षय वहाळकर, समृद्धी देसाई, शुभम देसाई या सहकलाकारानी विशेष मदत केली
www.konkantoday.com