मालगुंड ग्रामपंचायतीच्या ग्राम कृतीदलातर्फे गणपतीपुळे मार्गावर चेकपोस्टची उभारणी
ग्रामपंचायत मालगुंडतर्फे कृती दलाच्या पुढाकाराने गणपतीपुळे येथून येणार्या मार्गावर सावित्री वडाजवळ चेकपोस्ट उभे करण्यात आले आहे. गावामध्ये येणार्या सर्व वाहनांची चौकशी करून व त्याची नोंद करण्यात येत आहे. तसेच बाहेर गावाहून आलेल्या लोकांना विविध ठिकाणी संस्थात्मक विलीकरणासाठी ठेवण्यात येत आहे. याशिवाय ग्राम कृतीदलाच्यावतीने नियम करण्यात आले असून गावामध्ये प्रवेश करताना टू व्हिलर किंवा फोर व्हिलरमधून प्रवास करणार्या सर्वांनी सुरक्षित अंतराचा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले असून तसेच तोंडाला मास्क असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क कोणी आढळल्यास त्याला २०० रु. दंड करण्यात येणार आहे. गावातील सर्व कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरी बाहेर गावाहून व्यक्ती आल्यास त्याची माहिती ग्राम कृती दलाला देणे बंधनकारक करण्यात आले असून जर कुणी तसे आढळल्यास त्यावर रितसर कारवाई करण्याचेही ग्राम कृती दलाने ठरविले आहे.
www.konkantoday.com\