कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार १०० टक्के अपयशी ठरल्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप
राज्य सरकार कोरोनाच्या परिस्थिती हाताळण्यास १०० टक्के अपयशी ठरल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रत्नागिरी येथे बोलताना केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे जनतेचा उद्रेक होत असून आता त्यामुळे भाजपने महाराष्ट्र बचाव मोहीम हाती घेतली आहे. आता कुठे सरकार खडबडून जागे होत आहे. व तशाच पद्धतीची जाग आणण्यासाठी आम्ही रायगड, रत्नागिरी, सिंधुुदुर्गचा दौरा करीत असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले. ज्या अव्यवस्था आरोग्य सेवेमध्ये आहेत तसेच स्वॅबचे सेंटर नाहीत व मशिनरीच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही हा दौरा करत आहोत. आमच्याबरोबर आ. निरंजन डावखरे, आ. भाई गिरकर, आ. प्रसाद लाड, आ. रमेश पाटील आम्ही आमदार केवळ आढावा नव्हे तर मदतीसाठी आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कमतरता असलेल्या ठिकाणी तात्काळ निधी देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. स्वॅब सेंटरसाठी आपणाला मिरजला जावे लागत होते. याबाबत आम्ही अधिकार्यांची चर्चा केल्यानंतर त्यानी आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत स्वॅब तपासणीचे सेंटर उभे करु असे आश्वासन दिले. सावर्डा डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हे सेंटर उभे केले जाणार असल्याची अधिकार्यांनी माहिती दिली. त्यामुळे आमच्या दौर्यात हा मोठा निर्णय होईल असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्गात मा. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्येही स्वॅब तपासणी सुरू होणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.यावेळी भाजप(दक्षिण)जिल्हा अध्यक्ष अॅड दिपक पटवर्धन व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com