गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावे बाजारात विकला जात असल्याचा आरोप
कोरोना आणि अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसमोर आणखी एक मोठे संकट गुजरातच्या व्यापाऱ्यांनी उभे केले आहे. गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावे बाजारात विकला जात असल्याचा आरोप येथे होत आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक बागायतदार आणि व्यावसायिक अडचणीत आले आहेत. एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये ट्रक येत असून तेथे हा पल्प तयार करून विकला जात असल्याचे बागायतदारांनी सांगितले रत्नागिरी हापूसच्या नावाखाली गुजरातच्या आंब्याचा पल्प विकला जात आहे.यामध्ये स्थानिक बागायतदार, व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित यंत्रणेने यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.
www.konkantoday.com