हातखंबा येथे हाेमकाेराेन्टाइन केलेला इसम सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळला, गुन्हा दाखल
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱयांनी अनेक निर्बंध घातले आहेत मुंबई किंवा बाहेर येणाऱ्या चाकरमान्यांना
हाेमकाेराेन्टाइन केल्यानंतर त्यानी घरातच थांबण्याचे आदेश आहेत असे असतांना हातखंबा येथील हाेमकाेराेन्टाइन असलेले आनंद सुधाकर जोशी हे हातखंबा पोस्ट ऑफीस येथे फिरताना आढळले जोशी हे मुंबई डोंबवली येथून आले होते त्यानंतर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करून त्यांना हाेमकाेराेन्टाइनचा सल्ला देण्यात आला होता तरी देखील जोशी हे सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्याचे आढळून आले ही माहिती हातखंबा चे सरपंच व ग्राम कृती दलाचे अध्यक्ष विद्या बोंबले यांना कळल्यावर त्यांनी याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात जोशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली याबाबत पोलिसांनी जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com