जिल्ह्यातच उत्तर पत्रिका जमा करण्याबाबतचे केंद्र सुरू करावे, शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेची मागणी
दहावी, बारावी परीक्षा नियामकांनी तपासलेल्या उत्तर पत्रिका वेळापत्रकानुसार जमा करण्याच्या रत्नागिरी येथील कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशाला शिक्षक भारती सिंधुदुर्ग या संघटनेने आक्षेप घेतला आहे. कोरोना संसर्गाचा वाढते काेराेनारुण्न असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात जाणे धोकादायक असल्याने सुरक्षिततेसह क्वारंटाईनचे नियम सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने नियामकांसाठी शिथील करावेत किंवा जिल्ह्यातच उत्तर पत्रिका जमा करण्याबाबतचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी मंडळाच्या विभागीय सचिवाकडे केली आहे. अन्यथा रत्नागिरी येथे उत्तर पत्रिका जमा करण्यावर बहिष्कार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
नियामकांनी दहावी व बारावी परीक्षेच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका खाजगी वाहनाचा वापर करून रत्नागिरी येथे जमा करण्याचे आदेश कोकण विभागीय शिक्षण मंडळाने दिले आहेत.
www.konkantoday.com