महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३० हजाराचा टप्पा ओलांडला
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल १ हजार ६०६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०हजार ७०६ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक ६७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ४७९ वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत दिवसभरात ८८४ नवे रुग्ण आढळले आहे.तर ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १८ हजार ५५५ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधित मृतांचा आकडा ६९६झाला आहे.
www.konkantoday.com