
काय चाललय दापोली तालुका आरोग्य विभागात? काम करत असलेल्यांच्या बदल्या ! उघड्यावर घेता आहेत स्वॅब !
दापोली आरटीपीसीआर स्वॅब प्रयोगशाळे त अथवा आरोग्य केंद्रात न घेता चक्क उघड्यावर घेण्याचे प्रकार सुरू असताना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दापोली येथे कर्मचाऱ्यांची आदलाबदल हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी त्याचा परिणाम आरोग्याच्या कामांवर पडताना दिसत आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जि प आरोग्य सहाय्यक सतरा वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडुन असूनही ते बदलण्यात आलेले नाहीत. मात्र तालुका मुख्यालय येथे उत्तम काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती पिसई येथे करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षापासून दापोली तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी पदावरही नियमित स्वरूपात अधिकारी नव्हते त्यानंतर खेड येथे वादग्रस्त ठरलेले तालुका आरोग्य अधिकारी देण्यात आले. त्यातच सदर ठिकाणी कार्यरत असलेला एक आरोग्य सहाय्यक पिसई येथे पाठवण्यात आला आहे. पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आला आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ओपीडी व दुपारच्या सत्रामधील ओपीडी सुरू करण्याच्या सूचना नुकत्याच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दुपारी १ वा.वाजल्यानंतर वैद्यकीय अधिकारी सदर ठिकाणी हजर नसल्यामुळे दुपारच्या ओपीडी सुरू करताना अडचणी येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेला आरोग्य सहाय्यक हा पुन्हा दापोली येथे नेमणूक करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वादग्रस्त दापोली तालुका आरोग्य अधिकारी दापोलीत आल्यापासूनच ते बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. तरी तातडीने सदर प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com