रत्नागिरीत आज दुसरी एक रेल्वे दाखल,मोठ्या प्रमाणात प्रवासी रत्नागिरी स्थानकात उतरले
केंद्राने विविध राज्यात जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्याप्रमाणे काल रत्नागिरीत एक राजधानी एक्सप्रेस दाखल झाली होती.त्यामधून ४०० ते ५०० प्रवासी रत्नागिरीत उतरले होते.आज देखील परत रत्नागिरीत दुसरी एक गाडी दाखल झाली.आज गाडी नं ०२४१४ एनडीएलएस-मडगाव स्पेशल ट्रेन ही गाडी सकाळी दिल्लीहून रत्नागिरीत दाखल झाली.या गाडीतून देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रत्नागिरी स्थानकात उतरले.या प्रवाशांची संख्या अंदाजे ४५० ते ५०० होती.आजही उतरलेल्या लोकांची रितसर अर्ज भरून माहिती घेऊन त्यानंतर त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले.हे प्रवाशीही मडगावपर्यंत तिकीट काढून रत्नागिरीत उतरले आहेत. देशातील काही राज्यात अनेक कुटुंबीय अडकून होती त्यांना आपल्या भागात परतण्यासाठी केंद्र शासनाने या विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.
www.konkantoday.com