श्रीसिद्धिविनायक विश्वस्त मंडळाच्यावतीने तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटींचा धनादेश
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ पुढे सरसावले आहे तिवरे धरणाच्या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला होता तर गावातील अनेकांना मोठी झळ लागली होती त्याच्या पुनर्वसनाचाही प्रश्न निर्माण झाला होता तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेशजी बांदेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे ५कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला यावेळी सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे विश्वस्त संजय सावंत, जी आर दळवी, व सुमन घैसास आदी मान्यवर उपस्थित होते
www.konkantoday.com