
शाश्वत नारळ उत्पादन उद्योग अर्थक्रांती घडवू शकेल
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात २ सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुधारित नारळ जातीच्या रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, लांजा प्रमुख डॉ. आनंद हणमंते, रत्नागिरी उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, राजापूर तालुका कृषि अधिकारी सपकाळ, पावस मंडळ कृषि अधिकारी मासाळ, नारळ उद्योजक तुषार आग्रे, शास्त्रज्ञ डॉ. किरण मालशे व डॉ. संतोष वानखेडे उपस्थित होते.
तांत्रिक सत्रामध्ये प्रास्ताविक करताना डॉ. वानखेडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून नारळ दिनाचे महत्व सांगितले. मासाळ यांनी नारळ पिकासंदर्भात शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
www.konkantoday.com




