लॉक डाउन च्या काळात कोकणात अडकलेले परराज्यातील कामगार झारखंडला रेल्वेने रवाना
लॉक डाउन च्या काळात कोकणात अडकलेले परराज्यातील कामगार आज कोकण रेल्वेच्या माध्यमातुन त्याच्या राज्यात रवाना झाले. रत्नगिरी जिल्ह्यातील कामगार वर्ग आज कोकण रेल्वेच्या रत्नगिरी स्थानकातून -कोडरमा (झारखंड) या ट्रेन ने रवाना झाले.तर सिंधुदुर्गात अडकलेले परराज्यातील कामगार ओरोस स्थानकातून सुटलेल्या ओरोस-विजापूर या स्पेशल ट्रेनने रवाना झाले.रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येकी १४४० कामगार आज या स्पेशल ट्रेन ने आपल्या मूळ गावी रवाना झाली. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत रत्नगिरी- सिंधुदुर्गातील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हि जवाबदारी पार पाडली.
www.konkantoday.com