
उद्योगमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या युवासेनेच्या मालगुंड येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना उप नेते आमदार डॉ. राजन साळवी यांनी केला सत्कार
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत हे गणेश दर्शनासाठी मालगुंड परिसरात गेले होते. यावेळी ना. उदय सामंत हे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. ही बातमी युवासेनेला कळताच युवासैनिक एकत्र आले. युवासेना विभाग अधिकारी रोहित साळवी यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांनी मंत्री सामंत यांना काळे झेंडे दाखवले होते. रोहित साळवी यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून मंत्री उदय सामंत यांचा निषेध केल्याने युवासैनिकांचे शिवसेना उप नेते आमदार डॉ. राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी रोहित साळवी यांच्यासह युवासैनिकांचा शिवसेना उप नेते आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व युवासैनिकांच्या धाडसाचे वरिष्ठ नेते वरुण देसाई, खासदार विनायक राऊत यांनी युवासेना विभाग प्रमुख रोहित साळवी यांच्याशी संपर्क साधून युवासैनिकांचे कौतुक केले. यावेळी माजी उप जिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, माजी पं. स. सभापती उत्तम मोरे, उप तालुका युवासेना प्रमुख मंदार थेराडे, मालगुंड शाखाप्रमुख बावा आंग्रे, मालगुंड शाखाधिकारी मंदार पांचाळ, मालगुंड ग्रा. पं. सदस्य संतोष चौघुले, युवासैनिक सागर मेस्त्री, रुपेश चौघुले, निहार देसाई, प्रकाश नांदगावकर, प्रवीण पांचाळ, स्वस्तिक साळवी, आशिष साळवी, राजेश मालगुंडकर, प्रसाद पांचाळ, दशरथ साळवी, प्रथमेश पवार, अजय सावंत उपस्थित होते.