राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
सध्या कोरोनाचे संकट आहे. असे असताना अर्धा मे महिना होत असल्याने मान्सूनचीही चाहूल लागली आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून पाऊस सरासरीइतका कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो १६ मेपर्यंत अंदमान, निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात प्रवेश करु शकतो, असा अंदाज आहे.दरम्यान, महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १५ मेपर्यंत विविध भागांत मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. १३ ते १५ मे या कालावधीत प्रामुख्याने विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मध्य महाराष्ट्रात तुफान वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १४ मे रोजी कोकण विभागातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
www.konkantoday.com