
अखिल भारतीय पारंपरिक नृत्य स्पर्धेत ‘नृत्यार्पण’च्या नृत्यगानांचे यश
रत्नागिरी :
मुंबई येथे झालेल्या 10 व्या अखिल भारतीय पारंपरिक नृत्य स्पर्धेत रत्नागिरीतील नृत्यार्पण कला अकादमीच्या 5 नृत्यगणांनी कौतुकास्पद यश मिळवले असून त्यांच्या गुरु प्रणाली तोडणकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या नृत्य अनुभूती नृत्य स्पर्धेत कौत्वम नृत्य सादर केलेल्या ओवी साळवी हिचा द्वितीय क्रमांक मिळाला. पुष्पाजली सादर केलेल्या शुभ्रा आंब्रे हिचा तिसरा क्रमांक आला. तिल्लाना सादर केलेल्या बिलवा रानडे हिचा तिसरा क्रमांक आला. कौत्वम सादर केलेल्या मनस्वी भाटकर हिचा तिसरा क्रमांक तर पुष्पाजली सादर केलेल्या प्रेरणा सारंग हिला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या सर्वांच्या गुरु प्रणाली तोडणकर यांना सुद्धा नृत्यविष्कार उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सर्व यशस्वी नृत्यगणांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
www.konkantoday.com