रत्नागिरी जिल्हा हादरला एकाच दिवशी २२ रुग्ण काेराेना बाधित सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल २२रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने जिल्हा हादरला.एकूण २४अहवाल आत्ताच प्राप्त झाले त्यातील तब्बल २२अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.एकाच दिवशी एवढे मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळाल्याचे पहिलांदाच घडत आहे.यामध्ये मंडणगड तालुक्यात ११,दापोली ४, रत्नागिरीत ७ रुग्ण सापडले आहेत.रत्नागिरीत सापडलेल्या ७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ स्त्रिया असून ३ पुरुष आहेत. मंडणगडमधील ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ पुरुष व ४ स्त्रिया आहेत.तर दापोलीत सापडलेले ४ ही पॉझिटिव्ह पुरुष आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.यातील बहुतेक जणांची हिस्ट्री मुंबई येथील आहे.
www.konkantoday.com