रत्नागिरी जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या सातशे शाळा बंद होणार?
शिक्षण विभागाने राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चार हजार ६९० शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक सातशे शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी म्हणजे २१ शाळा बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभर खळबळ माजली असून गाव तीथे शाळा ही शिक्षण योजना कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दशकापासून राज्य सरकारने वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या हालचाली सातत्याने सुरु होत्या.मात्र, शैक्षणिक क्षेत्रातून विरोध होताच या हालचाली थांबल्या परंतू, सध्या कोरोनाच्या थैमानामुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहे. हेच कारण पुढे करत शासनाने दहा पटाखालील शाळा बंद करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत.
www.konkantoday.com