
राज्यात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू , विविध दुर्घटनेत आतापर्यंत ५९ लोक बेपत्ता-उपमुख्यमंत्री अजित पवार
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहा:कार उडाला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध दुर्घटनेत आतापर्यंत ५९ लोक बेपत्ता आहेत. तर ९० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. या दुर्घटनांमध्ये माणसंच नाही तर जनावरेही दगावली आहेत. आतापर्यंत विविध दुर्घटनेत ७५ जनावरे दगावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
www.konkantoday.com