कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून गावी पायी यायला निघालेल्या वृद्धाचा दुर्दैवी अंत
कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून गावी पायी यायला निघालेल्या खेड तालुक्यातील हुंबरी येथील एका वृद्धाचा मृतदेह विन्हेरे गाव परिसरातील जंगलात आढळून आला. सदाशिव भिकू कदम असे या वृद्धाचे नाव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यानंतर घाबरलेल्या या वृद्धाने अन्य काही साथीदारांसह ३० एप्रिल रोजी ठाणे येथून चालायला सुरुवात केली होती.विन्हेरे येथील जंगलातून वाट काढताना त्यांचे सहकारी पुढे निघून गेले आणि ते एकटेच मागे पडले हाेते.
विन्हेरे सुतारवाडी नजीकच्या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलांना दुपारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत महिलांनी स्थानिक पोलिसपाटील व सरपंचांना कळविले.मृतदेह कुजलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. खिशातील ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटली.त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले.त्यांच्यावर विन्हेरे व वरची हुंबरी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
www.konkantoday.com