केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावलीत बदल केल्याने आता डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढली
देशात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढं गेली आहे. मात्र, आता डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्याचं कारण म्हणजे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावलीत केलेला बदल. डिस्चार्ज संदर्भातले नियम बदलल्याने त्याचा तात्काळ परिणाम पाहायला मिळत आहे.
नवे नियम
♦️उपचारानंतर सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसल्यानंतर ३ दिवस ताप नसेल, तर १०दिवसांतच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल
♦️सौम्य लक्षणं आढळल्यानंतर कोरोना टेस्ट न करताच त्यांना डिस्चार्ज मिळेल
♦️ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांची डिस्चार्जच्याआधी टेस्ट करण्यात येईल
गंभीर रुग्णांचा ताप ३ दिवसात उतरला आणि पुढचे ४ दिवस शरिरात ऑक्सिजनची मात्रा ९५ टक्के राहिल्यास १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल
♦️जे रुग्ण गंभीर आहेत आणि व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची लक्षणं दूर झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळेल
♦️डिस्चार्जनंतर या रुग्णांना आता घरी १४ ऐवजी ७ दिवसच आयसोलेशनमध्ये राहावं लागेल
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील खाटा आणि कोरोना टेस्ट किटची उपलब्धता लक्षात घेता अभ्यास करुन हा निर्णय घेतल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञही ICMR शी सहमत आहेत.
www.konkantoday.com