मोठ्या प्रमाणावर येणाऱया चाकरमान्यांमुळे रत्नागिरी जिल्हय़ाची परिस्थिती हाताबाहेर -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अधिकृत परवाना घेऊन तर काही जण विनापरवाना मुंबई पुण्यातून लोक येत असल्यामुळे आता जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बोलताना स्पष्ट केले.जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर मुंबई पुण्याहून चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत.गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात अधिकृत ७३६ तर अनाधिकृत ६८ लोक आली आहेत.त्यापैकी मुंबई मनपा हद्दीतील ३४ लोक तर ठाणे क्षेत्रातील ६ लोक जिल्ह्यात आले आहेत.याबाबत आपण प्रधान सचिवांना पत्र पाठवून परिस्थिती कळवलेली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे आता सरसकट स्वॅब न घेता फक्त लक्षणे आढळणाऱ्यांचे स्वॅब घ्यावे अशा मार्गदर्शक सूचना आल्या आहेत.सध्या मंडणगड दापोली तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर बाहेरून येणाऱ्या लोकांच्या स्वॅबच्या तपासण्या न करता त्यांना थेट होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.त्यातील लक्षण असणाऱ्यांनाच फक्त रुग्णालयात दाखल करून त्यांची स्वॅब टेस्ट घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील इतर तालुक्यात हळूहळू हा प्रयोग राबवला जाणार आहे. जिल्ह्यातील दुकाने व बाजारपेठेतील दुकाने उघडण्या बाबत नियम व अटींवर परवानगी देण्यात येणार आहे.हे अधिकार त्या विभागाच्या प्रांतांना देण्यात आलेल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील वाईन मार्ट सुरू करण्याबाबत आदेश देण्यात येणार असून लवकरच शासन ऑनलाईन मद्यविक्री सुरू करण्याच्या विचारात असून लवकरच शासनाकडून आदेश आल्यानंतर ऑनलाईन मद्य विक्रीबाबत निर्णय घेण्यात येईल.यामुळे आता नागरिकांनी स्वतःची सर्व प्रकारे काळजी घेऊन कोरोनासोबत जगण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
www.konkantoday.com