
मुंबईत शनिवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के
मुंबईत शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल इतकी असल्याने त्याचा कोणताही मोठा परिणाम जाणवला नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत माहिती दिली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, मुंबईच्या उत्तरेला ९८ किमी अंतरावर समुद्र किनाऱ्यालगत दहा किमी अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते
www.konkantoday.com