
मंडणगड येथील पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने ‘सीएनजी’चा पुरवठा बंद
मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीचा नोबेल ऑटो पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळल्याने पंप व्यवस्थापकाने पंपावरील सीएनजी गॅस चा पुरवठा किमान दहा ते बारा दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद झाल्याने स्थानिक सीएनजी वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले आहेत.
शहरातील पालवणी फाटा येथील नोबेल ऑटो पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडसाठी घातलेली संरक्षण भिंत चार दिवसांपूर्वी पावसामुळे कोसळली. या संरक्षण भिंतीला लागुनच असलेला मोठा विद्युत जनरेटर व सीएनजी गॅस टाक्या आहेत, त्यामुळे संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करणे अपरिहार्य आहे. बांधकामाकडे दुर्लक्ष केल्यास पंपावरील उपकरणांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापकाने तातडीने नवीन काँक्रीटची संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे




