
राज्यात काल दिवसभरात १ हजार १६५नवे कोरोना रुग्ण
राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २० हजार २२८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात १ हजार १६५नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात काल३३० कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
www.konkantoday.com