राजस्थानचे कारागीर लॉकडाऊनमुळे संगमेश्वर बस स्थानकात अडकले

राजस्थानवरुन रत्नागिरी शहरात काम करण्यासाठी आलेले कारागीर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. हाताला काम नाही आणि गावातून आणलेले पैसे संपल्याने गावी पायी जाण्यासाठी निघाले होते.मात्र, संगमेश्वर येथे आले असता पोलिसांनी त्यांना अडवले. या तीन कारागीरांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने ते कामगार संगमेश्वर बस स्थानकात अडकून पडले आहेत. गेले तीन दिवस ते बसस्थानकात रहात आहेत. चंद्रकांत कुमावत, महाविर कुमावत आणि किशोर कुमावत अशी त्यांची नावे आहेत.
रत्नागिरी येथे हे तिघेही टाईलस बसवण्याचे काम करण्यासाठी आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button