
वायुगळती मधील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर,LPG वायूची गळती.
आज दिनांक 12/12/2024 रोजी दुपारी 2:30 ते 3:00 चे दरम्यान माध्यमिक विद्यालय जयगड येथील शाळेत LPG वायुचा वास पासरल्याने शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखीचा त्रास झाला आहे. सदर विद्यार्थी पैकी 08 विद्यार्थी – वाटद PHC 02 विद्यार्थी – ऊर्जा रुग्णालंय, जयगड येथे दाखल असून 22 विद्यार्थी यांना रत्नागिरी येथे पाठविण्यात आलेले आहे. सद्या 18 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल असून 02 विद्यार्थी परकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. सर्व विद्यार्थी यांची प्रकृती स्थिर आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे जिंदाल कंपनीच्या आवारात टाक्याची साफसफाई करीत असताना ही गळती झाल्याचे कळते प्रशासनाचे सर्वाधिकारी घटनास्थळी व रुग्णालयात संपर्क साधून आहेत