
मोफत एसटीची सेवा फक्त मजुरांसाठीच,शासनाचा पुन्हा एकदा नवा फतवा
काल शासनाने राज्यभरात एसटीचा मोफत प्रवास देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केला होता.परंतु आता मोफत सेवा ही राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी नाही, अशा आशयाचं पत्रक मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आलं आहे. या पत्रकात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील मजूरांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले मजूर जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी राज्य परिवहन विभागाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे.त्यामुळे या नव्या फतव्यामुळे नागरिकांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com