
पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी जाण्याचे आदेश काढले होते. त्यांचा व्हिसा रद्द करून तातडीने देश सोडण्यास सांगण्यात आले होते.त्यामुळे पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून मायदेशी जाण्यासाठी गर्दी करत होते. पण आता मोदी सरकारने याबाबत महत्वाच निर्णय घेतला आहे.पाकिस्तानी नागरिकांना 30 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेशापर्यंत मायदेशी परत जाऊ शकतात, असे आदेश स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला असून ते पुढील आदेश येईपर्यंत अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकतात.