रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १३ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल १३ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.एवढय़ा मोठय़ा संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. मंडणगड येथील कोरोना संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर खेड कळंबणी येथील कोरेनटाईन केलेल्या २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले. त्यामुळे जिल्ह्यात एका दिवसात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड येथील रुग्णांचा इतिहास हा मुंबईचा आहे त्यांना संस्थात्मक विलगीकरणा ठेवण्यात आले होते.यापैकी ९ जण पंदेरी गावातील असून १ म्हापळ व १ पालवनी येथील आहे. कळंबणी येथे सापडलेले २ पॉझिटिव्ह रुग्ण यांना लवेल येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.या सर्व रुग्णांचा इतिहास मुंबई प्रवासाचा आहे.आता यामुळे जिल्हा प्रशासनावरही मोठा ताण येणार आहे.यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८ इतकी झाली असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३४ इतकी झाली आहे.यातील ५ जणांना या अगोदरच डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १चा मृत्यू झाला होता.या सर्वांना कोरेनटाईन करून ठेवण्यात आले होते.रत्नागिरी जिल्ह्य़ात लागोपाठ कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com