
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा रत्नागिरी दौरा कार्यक्रम
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सोमवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता राजभवन मुंबई येथून हेलिकॉप्टरने तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.05 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथून प्रयाण. सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.25 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे आगमन. सकाळी 9.30 ते 10.30 वाजता DISMANTLING HINDUTVA या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती व राखीव. सकाळी 10.50 वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथून तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.05 वाजता तटरक्षक दल विमानतळ रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
www.konkantoday.com