इतर जिल्हयात जाणाऱ्या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची अट सार्वजनिक वाहनातून होणाऱ्या प्रवासाकरिता स्थगीत
लॉकडाऊन मुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत.इतर जिल्हयातील नागरिकांना आपापल्या जिल्हयात जाणेसाठी सरकार प्रयत्न करत आहे. इतर जिल्हयात जाणाऱ्या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची अट सार्वजनिक वाहनातून होणाऱ्या प्रवासाकरिता स्थगीत करण्यात आली आहे.यापूर्वी अशा वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होती. नव्या बदलानुसार आता सर्व प्रवाशांची बस मध्ये बसण्यापूर्वी तपासणी करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.आज अखेर जिल्हा बाहेर जाण्यासाठी 29880 जणांन जिल्हा प्रशासनाकडे अर्ज कले आहेत.रत्नागिरी जिल्हयात येण्याची विनंती करणाऱ्या अर्जांची आज अखेर एकूण संख्या 30814 आहे.
www.konkantoday.com