
चिपळूण खेर्डी येथील थ्री एम पेपर मिलच्या शेडच्या पत्राचे काम करीत असताना छपरावरून कोसळून कामगाराचा मृत्यू
चिपळूण खेर्डी येथील थ्री एम पेपर मिलच्या शेडच्या पत्र्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी छपरावर चढलेला कामगार छपरावरून खाली कोसळल्याने मृत्यू पावला जितेंद्र दिनानाथ प्रसाद वय ३१असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे हा कामगार मेंटनसच्या कामासाठी छपरावर चढला होता तो पत्रे बदलण्यासाठी शेडवरून चालत जात असता पत्रा फुटल्याने तो ३५फुटावरून खाली पडला व त्यामुळे तो मरण पावला असे काम करताना कामगाराला सेफ्टी बेल्ट लावला नाही व आवश्यक ती सुरक्षितता घेतली नाही म्हणून पोलिसांनी या प्रकरणी गुप्ता फॅब्रिकेटर चे ओमप्रकाश गुप्ता ,थ्री पेपर मिलचे मेंटेनन्स इंजिनिअर पपाई सिंगा , व कंपनीचे व्यवस्थापक हसमुख सांगाेईयांच्याविरोधात हयगय केल्याबद्दल व कामगारांच्या मृत्यूस कारणीभुतझाल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com