
केंद्र सरकारने दहा स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी ,जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश
केंद्र सरकारने दहा स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्सच्या बांधकामास आर्थिक मंजुरी दिली आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील बहुचर्चित अशा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळ रखडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आता चालना मिळणार आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एकूण ८ गिगावॅटच्या १० अणुभट्ट्यांवर काम चालू आहे. केंद्र सरकारने १० स्वदेशी ७०० मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स च्या बांधकामास एकूण ७ मेगावॅटच्या फ्लीट मोडमध्ये उभारण्यासाठी आर्थिक मंजुरी दिली आहे.
www.konkantoday.com