केंद्र व राज्य सरकारने घेतलेले निर्णय व स्थानिक पातळीवर काढण्यात येणारी परिपत्रके यात सुसूत्रता असावी आमदार भास्कर जाधव यांची मागणी
सध्या भारतासह महाराष्ट्रातकोरोनाने हाहाकार माजविला आहेजिल्ह्यात काेराेनाच्या बाबतीत निर्णय घेताना केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय व स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून काढण्यात येणारी परिपत्रके यात सुसूत्रता दिसत नाही याबाबत आपण लक्ष घालावे अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱयांना पत्र देऊन केली आहे
जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकाऱयांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे परंतु राज्य शासनाने घेतलेले निर्णय व प्रशासनाने स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय मार्गदर्शन सूचना यामध्ये विसंगती व गोंधळाची स्थिती आढळून येत आहे यामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिक यांच्यात अस्वस्थता आहे याबाबत ते माझ्याकडे संपर्क साधत आहेत याबाबत आपण जातीने लक्ष घालून राज्य शासनाचे निर्णय व प्रशासनाने घेतलेले निर्णय यात सुसूत्रता राहील याची काळजी घ्यावी प्रशासन चांगल्या प्रकारे करीत असलेल्या कामाला गालबोट लागू नये यासाठी आपणाकडे संपर्क साधत असल्याचेही या पत्रात जाधव यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com