नॅशनल लेवल अॅबॅकस कॉम्पिटिशन २०२५ दूर्वांक आणि प्रसेनजितने सोडवली आठ मिनिटांत १५० गणिते

सातारा : दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी स्मार्टअस नॅशनल लेवल ऑनलाईन अॅबॅकस कॉम्पिटिशन २०२५ पार पडली. यामध्ये स्मार्टअस अॅबॅकस क्लासेस कुवारबाव, रत्नागिरी सेंटरच्या दूर्वांक पवार याने ग्रेड A मध्ये तर प्रसेनजीत कांबळे याने ग्रेड E मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

अवघ्या ८ मिनिटांत दोन्ही विद्यार्थ्यांनी १५० पैकी १५० गणिते सोडवली. स्मार्टअस अॅबॅकस क्लासेस कुवारबाव, रत्नागिरी सेंटरच्या संचालिका तथा शिक्षिका सौ. माधवी कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन सेंटरमधील सर्व विद्यार्थ्यांना मिळाले होते. ‘स्मार्टअस नॅशनल लेवल ऑनलाईन अॅबॅकस कॉम्पिटिशन २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभासाठी यावेळी संस्थेचे संचालक डॉ नरेंद्र शेलार, स्मिता शेलार यांच्यासह प्र. पाहुण्या म्हणून मराठी सिनेतारका मा. गौतमी देशपांडे यांची उपस्थिती होती. युवाशक्ती फाउंडेशनचे डायरेक्टर मा. सतीश पवार देखील यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील ३० जिल्हे तसेच गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, प. बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि जम्मू काश्मिर व दमण या २ केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘स्मार्टअस एक्झाम्स’ या ऑनलाईन अॅप्लिकेशनचा वापर करून एकाच वेळी सर्व राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.

एकूण ५ ग्रेडमध्ये विभागलेल्या या परीक्षेत पहिल्या ४ ग्रेड मधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आणि ५ व्या ग्रेडमधील द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सायकल बक्षीस देण्यात आली, तर ५ व्या ग्रेडमधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला लॅपटॉप बक्षीस देण्यात आला. क्रमांक पटकावलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी, मेडल्स तसेच सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button